माहे जुलै महिन्यातील मंजूर केरोसिन नियतन / पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
माहे जुलै महिन्यातील मंजूर केरोसिन नियतन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 13 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माहे जुलै 2020 साठी तालुकानिहाय 132 कि.ली केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. तालुकानिहाय केरोसिन नियतन पुढीलप्रमाणे
दोडामार्ग तालुका- 2, सावंतवाडी तालुका- 9, वेंगुला तालुका- 8, कुडाळ तालुका- 8, मालवण तालुका- 8, कणकवली तालुका- 9, देवगड तालुका- 9 व वैभववाडी- 7 असे एकूण 132 कि.ली. केरोसिन मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.
00000
पंडित दीनदयाळ उपाध्याय
ऑनलाईन रोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 13 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत मंगळवार दि. 14 जुलै ते शुक्रवार दि. 17 जुलै या दरम्यान ऑनलाई रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पनवेल, पुणे या जिल्ह्यातून अनेक उद्योजकांकडून पेन्टर, सर्व्हिसिंग मॅन, सर्व्हिसिंग ऑडवायझर, आकाऊंट, सेक्युरिटी गार्ड, सेक्युरिटी सुपरवाईझर फायर, कॉम्प्युटर हार्डवेअर, वेल्डर, कारपेंटर, फिटर, शिपाई, सेमीस्कील्ड वर्कर आदी पदांसाठी आवश्यक त्या पात्रताधारक उमेदवारांसाठी 207 पदे रिक्त असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी ईच्छिूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर जावून रजिस्ट्रेशन करुन नंबर व पासवर्ड लॉगीन करण्यात यावे. त्यानंतर त्यामध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करुन सिंधुदुर्ग जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला ॲप्लाय सादर करावा. अधिक माहितीसाठी 02362-228835 व 9403350689 या दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर त्याचबरोबर sindhudurgrojgar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment