दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद /मालवण तालुक्यातील मौजे सुकळवाड ठाकरवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी
(जि.मा.का) दि. 11 : गेल्या
चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद
झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 39.800 मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत एकूण 1859.275 मि.मी.
पावसाची नोंद झाली आहे.
तालुका
निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 62 (1804), सावंतवाडी 53 (1917), वेंगुर्ला 54.40
(1829.20), कुडाळ 47 (1722), मालवण 36 (2365), कणकवली 30 (1849), देवगड 20 (1687), वैभववाडी 16 (1701), असा पाऊस झाला आहे.
00000
मालवण
तालुक्यातील मौजे सुकळवाड
ठाकरवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी
(जि.मा.का) दि. 11 : मालवण
तालुक्यातील मौजे सुकळवाड ठाकरवाडी येथील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
सदरचा 500 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या
क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था,
बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे
उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51
व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,
1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) च्या कलम 188
अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ
प्र.उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment