मालवण तालुक्यातील मौजे वराड मोऊळवाडी येथे कंटेन्मेंट झोन / कणकवली तालुक्यातील मौजे जांभूळगाव ब्राम्हणवाडी येथे कंटेन्मेंट झोन /सुशिक्षित बेरोजगारांनी 15 ऑगस्ट पूर्वी अद्यायवत ऑनलाईन नोंदणी करावी

मालवण तालुक्यातील मौजे वराड
मोऊळवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 :  मालवण तालुक्यातील मौजे वराड मोऊळवाडी येथील 300 मीटर परिघ क्षेत्रात   कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 27 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.  हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
00000
कणकवली तालुक्यातील मौजे जांभूळगाव
ब्राम्हणवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 :  कणकवली तालुक्यातील मौजे जांभूळगाव ब्राम्हणवाडी येथील 500 मीटर परिघ क्षेत्रातील 51 घरांमधील 36 कुटुंबातील 183 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 28 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.  हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
सुशिक्षित बेरोजगारांनी 15 ऑगस्ट पूर्वी 
अद्यायवत ऑनलाईन नोंदणी करावी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 16 : पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व आताच्या जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाकडून सुशिक्षित बेरोजगारांची नाव नोंदणी करण्याची संधी उपब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.शं.पवार यांनी दिली.
            सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या नाव नोंदणीचे अपडेशन करुन नोंदणी क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्यात यावा. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर या ऑपशनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून ऑनलाईन नोंदणी अद्यायवत करण्यात यावी. सदरची नोंदणी 15 ऑगस्ट नंतर रद्द होणार आहे, यांची सुशिक्षित बेरोजगारांनी नोंद घ्यावी. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास 02362-228835 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
0000


Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'