कणकवली शहरासह तालुक्यातील कलमठ व नांदगाव तिठा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनरी (जि.मा.का) दि. 29 –  कणकवली शहर बाजारपेठेतील दोन घरांचा समावेश असणारा 50 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. तालुक्याील कलमठ - बिडयेवाडी येथील साईकृपा अपार्टमेंट व 50 मीटरचा परिसर आणि नांदगाव तिठा येथील 92 घरे, 103 कुटुंबे आणि 478 लोकसंख्या असणारा 100 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
       कणकवली बाजारपेठ येथील  कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. तर कलमठ आणि नांदगाव तिठा सदर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये हे आदेश दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजीपर्यंत लागू राहणार आहेत. सदर हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000


Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'