जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका) : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 या अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी, संबधीत शाखेचे संतोष परुळेकर आदी उपस्थितीत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदयांतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सदयस्थिती, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, अत्याचार पिडीतांना नुकसान भरपाई इत्यादी बाबीचा आढावा घेतला. यावेळी श्री. संतोष चिकणे यांनी पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त व अर्थसहाय्य याबाबतचा आढावा समितीसमोर दिला. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'