भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज अनिवार्य
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृहासाठी शालेय अभ्यासक्रमासाठी दिनांक ३० जुन पर्यत आणि ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिनांक १५ जुलै, २०२६ पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmasnew.mahait.org अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित महाविदयालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विदयार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत सूचित करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांनाच स्वाधार योजनेचा पात्र ठरविले जाईल. मागील परिक्षेत 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत. ते दोन्ही योजंनापासून वंचित राहतील. तसेच ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना योजनेच्या नियमांमध्ये समाज कल्याण विभागाने महत्वपुर्ण बदल केला आहे. नव्या नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात मुलांचे शासकीय वसतिगृह मालवण, वेंगुर्ला व कणकवली तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड या ठिकाणी कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (संपर्क क्रमांक ०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दीपत्रकात केले आहे.
00000
Comments
Post a Comment