जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी,दि.11 (जि.मा.का):- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उपलब्ध आहेत. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, किंवा सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही श्री. शिणगारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'