क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी निवड चाचणी

सिंधुदुर्ग नगरी दि.२५( जिमाका):- शिवछत्रपती क्रीडा पीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेशा करता निवड चाचण्यांची आयोजन/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेश सन २०२६-२७ करिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे .राज्यात आठ क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून यामध्ये प्रवेशा करता पुनःश्च एकदा निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिम्नॅस्टिक अँथलेटिक्स सायकलिंग (खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र) शूटिंग, बॉक्सिंग आर्चरी या खेळांच्या सरळ प्रवेश व कौशल्य चाचण्या घेण्यात येणार आहेत. क्रीडा प्रबोधिनी साठी राज्यस्तरावर सरळ प्रवेश चाचणी दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक्स ,सायकलिंग शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे, शूटिंग छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर, बॉक्सिंग ,क्रीडा प्रबोधिनी अकोला, आर्चरी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे होणार आहेत तसेच सदर खेळाच्या राज्यस्तर खेळनिहाय कौशल्य चाचणी दिनांक ३० जून २०२६ रोजी वर नमूद केलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता सरळ प्रवेश चाचणीसाठी राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले तसेच कौशल्य चाचणीसाठी राज्यस्तर सहभागी खेळाडू पात्र राहतील. १९ वर्षाच्या आतील खेळाडूंना या चाचण्यांमध्ये सहभाग घेता येईल. क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास ,भोजन, गणवेश व प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे. तरी वर नमूद केलेल्या अहर्ता धारक खेळाडूनी चाचण्यांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री विजय शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी केले आहे. खेळनिहाय निवड चाचण्यांचे आयोजन पुढीलप्रमाणे- राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रिया - १) खेळ प्रकार- जिम्नॅस्टिक मैदानी सायकलिंग खेलो इंडिया राज्यनिपुणता केंद्र, चाचणी दिनांक २९ जून २०२६ खेळाडू उपस्थिती २९ जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत, चाचणी स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे ४५. २) शूटिंग २९ जून २०२६ खेळाडू उपस्थिती २९ जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत, चाचणी स्थळ- विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर. ३) बॉक्सिंग -चाचणी दिनांक २९ जून २०२६,खेळाडू उपस्थिती २९ जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत, चाचणी स्थळ क्रीडा प्रबोधिनी अकोला.४) आर्चरी-चाचणी दिनांक- २९ जून २०२६ खेळाडूंची उपस्थिती- २९ जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चाचणी स्थळ क्रीडा प्रबोधिनी अमरावती, राज्यस्तरीय खेळनिहाय कौशल्य चाचण्या कार्यक्रम - १) जिम्नॅस्टिक मैदानी सायकलींग (खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, चाचणी दिनांक- ३०जून २०२६ खेळाडू उपस्थिती- ३० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चाचणी स्थळ शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे, ४५.२) शूटिंग चाचणी दिनांक- ३० जून २०२६ खेळाडू उपस्थिती- ३० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चाचणी स्थळ विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर. ३) बॉक्सिंग- चाचणी दिनांक- ३० जून २०२६ खेळाडू उपस्थिती- 30 जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत चाचणी स्थळ क्रीडा प्रबोधिनी अकोला.४) आर्चरी_ चाचणी दिनांक- ३० जून २०२६ खेळाडूंची उपस्थिती ३० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चाचणी स्थळ- क्रीडा प्रबोधिनी अमरावती 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'