महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांची दखल घेण्यासाठी केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी (पद्मश्री, पद्मविभूषण व इतर) नामांकन सादर करण्यासाठी केंद्रशासनाकडुन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल व संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी पात्र महिलांनी आपली माहिती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत सादर करावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. या पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
000000
Comments
Post a Comment