महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १४ जून रोजी
सिंधुदुर्गनगरी, दि.११ (जि.मा.का):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवली तालुक्यातील एकूण 2 व कुडाळ तालुक्यातील 1 उपकेंद्रावर एका सत्रामध्ये सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण 1066 उमेदवार बसणार आहेत. उपकेंद्राचे नांव व बैठक क्रमांक - १) विदयामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, बैठक क्रमांक 2700001 ते 2700336, 2) कणकवली कॉलेज कणकवली, बैठक क्रमांक 2700337 ते 2700720, 3) कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनियर कॉलेज कुडाळ, बैठक क्रमांक 2700721 ते 2701066 परीक्षेची बैठक व्यवस्था वरीलप्रमाणे कणकवली तालुक्यातील 2 उपकेंद्रावर व कुडाळ तालुक्यातील 1 उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणा-या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेणेत येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचा-यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक / भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
00000
Comments
Post a Comment