काम वाटप समितीची स्थापना

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने रु.3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्ययासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शासन निर्णय नुसार जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यांत आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरीता पत्रे प्राप्त झालेली आहेत. ज्या सेवा सोसायट्या या कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळणेबाबतचे आपले प्रस्ताव दि. 18 ऑक्टोबर 2023 सायं. 5 वाजेपर्यपत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात सादर करावे. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तताकरणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपुर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.पां.चिमणकर यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'