लेखापरीक्षक नामतालिकासाठी ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1930 चे कलम 81 अन्वये सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, निबंधकांनी तयार केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालीकेवरील लेखापरीक्षकांकडून करवून घेण्याची तरतूद आहे. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांच्या नामतालीकेसंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 ब आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (1) (फ) मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षणासाठी सन 2024-26 या कालावधीसाठी लेखापरीक्षकनामिका तयार करण्यासाठी www.mahaasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दि. 23 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासंदर्भातील सविस्तर तपशील वेबसाईटवर तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग व जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तरी सद्यस्थितीत सहकारी खात्याच्या लेखापरीक्षक नामिकेवर असलेल्या लेखापरीक्षकांनी तसेच नामतालीकेवर नव्याने येवू इच्छिणाऱ्या लेखापरीक्षकांनी, उक्त निर्धारीत मुदतीत उपरोल्लेखीत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. नामतालीकेवरील समावेशासाठी करावयाच्या अर्जासंदर्भातील सूचना तसेच याबाबतचे अधिक माहितीसाठी या कार्यालयाकडे संपर्क करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडुन करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'