खरीप हंगामासाठी ई पीक पहाणी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु- भगिनींना शासनाच्या विविध योजनांचा जसे की प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळाणारे लाभ घेतना अडचणी टाळण्यासाठी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वत:च्या मोबाईलवरुन आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पिक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे 1.88 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करुन घ्यावे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरु करण्यात आले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'