पोलीस पाटील पद आरक्षण सोडत सभा 18 ऐवजी 20 ऑक्टोबरला

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): कणकवली महसूल उपविभागातील नागरीकांना कळविण्यात येते की, कणकवली उपविभागातील तहसिल कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता कणकवली- 53 देवगड -45 व वैभववाडी -37 अशा एकूण - 135 पदांकरीता होणार आहे. मंजूर बिंदूनामावली प्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीद्वारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढणे करीता दिनांक 18/10/2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली याठिकाणी सभेचे आयोजन करणेत आलेले होते. तथापि, सदरची सभा रद्द करून दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली याठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. संबंधित गावातील इच्छुकांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कणकवली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष जगदीश कातकर यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'