तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथी व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, शिधा पत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करुन तृतीयपंथीयांना ओळखपत्र देणे व प्रमाणपत्र मिळवून देणे यासाठी तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 02362 228882 संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा हेल्पलाईन क्रमांकाव्दारे संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती घ्यावी, तसेच काही समस्या व तक्रारी असतील तर त्याबाबत माहिती द्यावी असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'