महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस संस्थेचे आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य सरथेचे मुख्य आश्रयदाते पद राज्यपाल रमेश बैस यांना बहाल करण्याचा समारंभ राजभवन येथे दि.26 सप्टेंबर 2023 मोठया दिमाखात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यास स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य डॉ. सुहास दिवसे यांनी राज्यपाल महोदयांना स्काऊट गाईड प्रतिज्ञा दिली. राज्यपाल महोदय यांच्या मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच स्काऊट गाईड स्कार्फ आश्रयदाते पदक बहाल करण्यात आले. स्काऊट गाईड स्कार्फ परिधान केल्याने व्यक्तीला नम्रतेची आणि कर्तव्याची जाणीव होते. देशातील 47 लाख स्काऊट गाईड पैकी 13 लाख सदस्य एकट्या महाराष्ट्राचे आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे राज्यपाल यांनी आर्वजून नमूद करून राज्यात स्काऊट आणि गाईडसनी युवकांमध्ये व्यसन मुक्तीसाठी मोठे अभियान राबवावे, तसेच प्रत्येक स्काऊट गाईडने एकतरी वृक्षाची लागवड करून संवर्धन करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. स्काऊट आणि गाईडनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात तसेच कोविड महामारी काळात चांगले काम तसेच शाळा महाविद्यालयांनी स्काऊट गाईडचे काम गांभीर्यपूर्वक करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. या समारंभाच्या प्रास्ताविकात राज्य मुख्य आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगितला. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे चारित्र्य घडवले जाते तसेच विश्वबंधुत्व भावनेचे संवर्धन केले जाते, सर्फ स्मार्ट मैसेंजर ऑफ पिस, फ्री बीईंग मी, या उपक्रमात मोठ्या प्रमाणात स्काऊट आणि गाईडनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात काम केले असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला श्वेता सिंघल (भा.प्र.से). राज्यपालांच्या सचिव (प्रभारी), विपीन कुमार सक्सेना (भा.प्र.से) सेवानिवृत्त, राज्यपालांचे विशेष सचिव, उमेश काशीकर, राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, सुनिल हंजे, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, नवनाथ बी. फरताडे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग मुंबई, मिलिंद बी. दिक्षीत, सहाय्यक संचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काउटस् आणि गाइडस् राज्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेच्या राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी आभार प्रदर्शन केले. समारंभाचे सुत्रसंचलन गोविंद केंद्रे, सहा राज्य प्रशिक्षण आयुक्त (स्का) यांनी केले. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'