शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रेवश
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का): सामाजिक न्याय विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये विद्यार्थी/ विद्यार्थीनींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे.
या शासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन न राबविता ऑफलाईन राबविण्यात येणार आहे. शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परिपत्रका अन्वये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतिम मुदतवाढ दि. 31 ऑक्टोबर 2023 करण्यात आलेली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थींनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज संबंधित मागासवर्गीय मुलां/ मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड या वसतिगृहांकडून विनामुल्य अर्ज उपलब्ध करुन आवश्यक कागदपत्रासह वसतिगृहात प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांचे दूरध्वनी क्र. 02362-228882 वर संपर्क साधावा.
००००
Comments
Post a Comment