पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून पिंगुळी ता. कुडाळकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पिंगुळी येथे आगमन व श्री. अभयजी वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था यांची भेट. स्थळ:- सनातन आश्रम, पिंगुळी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग. सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ:- मराठा मंडळ हॉल, कुडाळ जि. सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता कुडाळ येथून भरड, ता. मालवणकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता भरड, ता. मालवण येथे आगमन व गडकिल्ले माती संकलन कलश यात्रा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता राजकोट मालवण शिवपुतळा चौथरा गडकिल्ले माती अर्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्त्यांचा शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- चिंदर ता. मालवण जि. सिंधुदुर्ग .सायं. 5 वाजता परुळे ता. वेंगुर्लाकडे प्रयाण. सायं. 6 वाजता परुळे ता. वेंगुर्ला ग्रामपंचायत भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7 वाजता सिंधुदुर्ग येथून मनोहर विमानतळ (मोपा), गोवा विमानतळाकडे प्रयाण. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'