जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे काम काज सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): महाराष्ट्र शासनाच्या दि. 05 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग येथील आयोगाचे अध्यक्ष आणि दोन्ही सदस्य यांची पूर्णवेळ कामासाठी नियुक्ती झालेली आहे. दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी आयोगाच्या 'अध्यक्ष' पदी इंदुमती श्रेयस मलुष्टे या रुजू झाल्या आहेत. तसेच अर्पिता पराग फणसळकर आणि योगेश यशवंत खाडिलकर हे 'सदस्य' पदावर दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी रुजू झाले असून आयोगाचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग कडील प्रशासनाकडून अध्यक्ष व सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळेस अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व हितसंबंधित पक्षकार, वकील तसेच अन्य तद्संबंधित संस्था यांनी ग्राहक आयोगाकडील प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. आयोगाकडे नवीन प्रकरणे दाखल करणे तसेच इतर कामकाज सोमवार ते शुक्रवार शासकीय सुट्टी वगळता चालवले जाईल असे आयोगाच्या अध्यक्ष, इंदुमती श्रेयस मलुष्टे यांनी सांगितले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'