पंतप्रधानांच्या हस्ते 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे उद्घाटन · दूरदृष्यप्रणालीव्दारे गुरुवारी होणार उद्घाटन · राज्यातल 511 गावांची निवड · जिल्ह्यातील 8 गावांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता ग्रामीण भागात 500 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' (PM-GKVK) निर्माण करण्यात येणार आहेत. याअंतर्गत जिल्हयात 8 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता दूरदृष्यप्रणालीव्दारे (ऑनलाईन) होणार आहे. जिल्हयात ग्रामपंचायत शिरगांव, साठेली भेडशी, पिंगुळी, आचरा, शिरोडा, कोकीसरे, माजगांव, या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन ग. पां. चिमणकर, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिधुदुर्ग यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'