जिल्ह्यातील नागरिकांनी 'महसूल सप्ताहाचा' लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील महसूल विभागाकडून 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. बुधवार 2 ऑगस्ट रोजी "युवा संवाद हा उपक्रम तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे सकाळी 10 ते 5 पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये मतदार जनजागृती करणे व मतदार नोंदणी करीता कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. गुरुवार 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा हा उपक्रम तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे सकाळी 10 ते 5 पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टी/ पूर यामुळे बाधीत झालेल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार नुकसान भरपाई देणे. तसेच कातकरी उत्थान अभियान राबविण्यात येणार आहे. शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद हा उपक्रम तहसिलदार कार्यालय सावंतवाडी सकाळी 10 ते 5 पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सलोखा योजना पात्र लाभार्थी निवड करुन त्याअनुषंगिक कार्यवाही करणे व महसूल/ फेर फार अदालत घेणे तसेच मयत खातेदार यांच्या वारस तपासबाबत कार्यवाही करणे. शनिवार 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम तहसिलदार कार्यालय सावंतवाडी सकाळी 10 ते 5 पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचे घरासाठी / शेतीसाठी जमीन वाटपा संदर्भात कार्यवाही करणे तसेच महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र सैनिकांच्य कुटुंबीयांना वाटप करणे. रविवार 6 ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे व सेवापुस्तके अद्यावत करणे. सोमवार 7 ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे महसूल सप्ताहामधील विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पती व उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून सप्ताहाचा सांगता होईल. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'