महसूल सप्ताहानिमित्त कुडाळ येथे कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, विविध योजना याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा यासाठी ‘महसूल सप्ताह’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत गुरूवार 3 ऑगस्ट रोजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी ठिक 4 वाजता कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
ह्या कार्यक्रमात अतिवृष्टी , पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या नारिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तसेच कातकरी उत्थान अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
00000
Comments
Post a Comment