महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना घरपोच दाखल्यांचे वाटप
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जिमाका) : शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम महसूल विभाग करते. ह्या अनुषंगाने 7 ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह’ सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील नागरिकांना महसूल दुतामार्फत जातीचे दाखले घरपोच वाटप करण्यात आले.
या विशेष अभियानांतर्गत देवगड तालुक्यात कातकरी वस्तीमध्ये जाऊन त्यांना जातीचे दाखले देण्यात आले आहे. मोंड -11, सौंदाळे-13, मुणगे-14 तर शिरगाव येथे 6 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार आर.जे.पवार आदी उपस्थित होते.
0000000
Comments
Post a Comment