जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.08 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवार दि.23 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग.पां चिमणकर यांनी केले आहे.
उद्योजकांनी आपल्या आस्थापनेवार असलेली रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Sindhudurg pandit Dindayal Upadhyay Online job Fair ४ मध्ये अधिसूचित करावीत. ज्या उद्योग आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम पोर्टलवर नोंदणी करुन रिक्तपदे अधिसूचित करावीत. उद्योजकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळवा 4 मध्ये रिक्तपदे अधिसूचित केल्यानंतर नोकरी साधक (JOB SEEKER)उमेदवारांनी वरिल पोर्टलवर स्वत:च्या लॉगीनने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ॲप्लाई करावे. अधिक माहितीसाठी 02362 228835, ई-मेल sindhudurgrojgar@gmali.com
वर संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment