सहकार विभागात गट-क पदभरती 14 व 16 ऑगस्टला ऑनलाईन परीक्षा

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.) : सहकार विभागातील गट-क वर्गातील सरळसेवेव्दारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी टी.सी.एस. कंपनीमार्फत सोमवार, 14 ऑगस्ट आणि बुधवार, 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एम.बी. सांगळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील केंद्र मेट्रोपोलिटन इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट ओरोस, मु. सुकळवाड पो. ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सोमवार दि. 14 ऑगस्ट आणि बुधवार 16 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 वाजता आणि दुपारी 12.30 ते 2.30 वाजता तसेच सायं. 4.30 ते 6.30 वाजता अशा तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनीवर आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करण्याची नोंद घ्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'