'मेरी माटी मेरा देश' अंतर्गत जिल्हा ग्रंथालय येथे ग्रंथप्रदर्शन
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : स्वातंत्र्याचा अमृत माहोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या नवीन उपक्रमानिर्मित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत ग्रंथप्रदर्शन दि. 9 ते 11 ऑगस्ट 2023 रोजी कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वाचक सभासद यांनी ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे.
००००
Comments
Post a Comment