जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.): तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 354.142 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.16 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 74.6720 (76.18), अरुणा – 77.8844 (84.63), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.616 (19.82), ओटाव- 3.887 (52.31), देंदोनवाडी – 0.673 (6.87), तरंदळे – 7.776 (79.27), आडेली- 1.254 (97.63), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 3.085 (96.41), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.600 (66.50), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.892 (75.56), दाभाचीवाडी- 2.235 (92.32), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामापूर – 0.966 (39.57), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.310 (97.83), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.677 (58.21), शिरगाव – 0.976 (61.69), तिथवली – 1.710 (99.25), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 0.797 (50.32), शिरवळ- 1.261 (61.87), वर्दे- 0.733 (47.14) कोकीसरे – 0.720 (39.65), नानीवडे (महाजनवाडी) – 1.083 (60.60), सावडाव- 1.261 (52.33), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.610 (34.44) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
वृत्त क्र.590
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.250 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.900 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे. कणकवली-वागदे, राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 35.000 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 1.500 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment