माजी सैनिकांनी, विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर कर

ा सिंधुदुर्गनगरी दि 31 जिमाका:- जिल्ह्यात विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडु, साहीत्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते,यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता 10 वी तसेच 12 वी च्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी संबंधित कार्याबाबतची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'