प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : केंद्र शासन पुरस्कृत जिल्हास्तरावर प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मंजूरी समिती गठन करणे आवश्यक असून त्यासाठी एक सदस्य असलेल्या प्रतिनिधी नेमावयाचा आहे. अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यासाठी प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व व अनुरक्षण या संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हास्तरावर प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व मंजुरी समिती चे गठन करणे आवश्यक आहे. तरी या कमिटी करिता 1 सदस्य बालकांच्या संरक्षणाशी संबधित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी नेमावयाचा आहे. त्या संबंधीचे अटी शर्थी खालीलप्रमाणे. सदर अशासकीय व्यक्ती किमान पदवीधर असून तिला बाल हक्क व काळजी व संरक्षण क्षेत्रातील किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. सदस्याचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. सदस्याचा कालावधी नेमणुकीपासून 3 वर्षाचा राहील. तरी इच्छुक उमेदवारांनी दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत ए-विंग, तळमजला दालन क्र. 106 सिंधुदुर्गनगरी या कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत. विहित मुदतीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल, इच्छुकांनी विहित मुदतीत सदस्य पदाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'