मत्स्यव्यवसाय योजना करीता १५ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता.) रत्नाकर राजम
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या ३ वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवयाच्या योजना करीता प्रस्ताव सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.
३१ मार्च २०२३ रोजी २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपत आहे. सन २०२२-२३ अंतर्गत प्राप्त प्रस्तावाची तपासणी छाननी व प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास सादर करणे इत्यादी करीता अवधी लागणार असल्याने सिधुरत्न समृद्ध सन २०२२-२३ अंतर्गत प्रस्ताव दि.१५ मार्च २०२३ रोजी पर्यंत सादर करावेत. तरी आपले मत्स्य सहकारी संस्थेच्या सभासद यांना याबाबत तात्काळ अवगत करावे. सदर योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव आपले कार्यक्षेत्रातील परवाना अधिकारी यांना दि.१५/०३/२०२३ रोजी पर्यंत सादर करावे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता.) मालवण रत्नाकर प्रभाकर राजम यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment