क्रीडा सवलत गुणांचे परीपूर्ण प्रस्ताव 5 एप्रिल पर्यत सादर करावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : जिल्ह्यातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्याचे क्रीडा सवलत गुणांचे परीपूर्ण प्रस्ताव (प्रत्येक खेळाडूसाठी स्वतंत्र प्रस्ताव ) तयार करून दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, येथे दि. 5 एप्रिल 2023 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बोर्ड अंतर्गत असलेल्या शाळेतील इ.10 वी व इ.12 वी मधील खेळाडू "विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेसाठीचे प्रस्ताव शालेयस्तरावरून या कार्यालयात पुढीलप्रमाणे विहित नमुन्यातील प्रपत्र व आवश्यक माहिती, कागदपत्रानुसार सादर करावयाचे आहे. खेळाडू विद्यार्थ्याचे क्रीडा सवलतीचे गुणांचे प्रस्ताव सादर करणे बाबतचे कव्हरींग पत्र. शासकीय / संघटनेच्या जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठी खेळाडू विद्यार्थ्यांची यादी. प्रपत्र 1 ग्रेस मार्क मिळणेसाठी करावयाचा अर्जाचा विहित नमुना- शासकीय स्पर्धा. प्रपत्र 2 ग्रेस मार्क मिळणेसाठी करावयाचा अर्जाचा विहित नमुना मान्यता प्राप्त एकविध खेळ संघटना स्पर्धा. खेळाडू विद्यार्थ्याचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्राची साक्षांकित झेरॉक्स प्रत. खेळाडू विद्यार्थी हॉल तिकीट झेरॉक्स प्रत (टिप- बैठक क्रमांक चुकल्यास संबंधित शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय जबाबदार राहील).प्रपत्र 3 जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे क्रीडा सवलतीचे गुण बाबतचे शिफारस प्रमाणपत्र.(फॉर्म मधील क्र. 1 ते 9 ची माहिती शाळेने भरावयाची आहे) (उर्वरीत माहिती कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहे). विभागीय मंडळाकडे छाननी शुल्क भरणा केलेल्या चलनाची प्रत जोडणे आवश्यक आहे. क्रीडा सवलत गुण मिळणेसाठी पात्र खेळ - आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, सायकलिंग, फुटबॉल, हँडबॉल, ज्युदो, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, कबड्डी, बेसबॉल, कराटे, वुशू, सुब्रतो मुखजी कप फुटबॉल, सेपक टकरा, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ, थ्रोबॉल, योगासन, सिकई मार्शल आर्ट्स, डॉजबॉल, टेनिक्वाईट, अॅथलेटीक्स, (वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, व्हॉलीबॉल, रायफल शूटिंग, तायक्वांदो, कुस्ती, सॉफ्टबॉल, नेटबॉल, स्क्वॅश, नेहरू कप हॉकी, रग्बी, मॉडर्न पेंटेथलॉन, खो-खो, कॅरम, क्रिकेट, रोलर स्केटिंग/ हॉकी, किक बॉक्सिंग, रोल बॉल, शुटींग बॉल, आट्यापाट्या. विहित मुदती नंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घेऊन कार्यवाही करावी. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'