सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती योजनांची कलापथक व चित्ररथाव्दारे प्रचार- प्रसिध्दी - जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : अनुसूचीत जातीच्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेत असते. या निर्णयांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचावा त्याची प्रचार- प्रसिध्दी व्हावी, यासाठी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय प्रचार- प्रसिध्दी करते.सध्या जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या योजनांची कलापथक व चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार- प्रसिध्दी सुरु असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कलापथक व चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये फिरणार आहे. कला पथकामध्ये शाहीर कल्पना माळी,तळवणे- सावंतवाडी, विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी गुढीपूर व चैतन्य महिला विकास मंडळ बांदा- सावंतवाडी यांचा समावेश आहे. तर स्काय क्रिएशन, कोल्हापूर येथील चित्ररथ आहे. कला पथक व चित्ररथामध्ये अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या अनेक योजनांची सविस्तर माहिती व्हीडिओ जिंगल्सच्या माध्यमातून दिली जात आहे.अनुसूचित जातीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कला पथकाव्दारे सांगितलेली व चित्ररथावरुन प्रसारित होणारी माहिती पाहून व जाणून घेवून त्या योजनांना लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सातपुते यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'