वीज, वारा मेघगर्जनेसह 16 व 17 मार्चला पावसाची शक्यता नागरिकांनी दक्षता घ्यावी
सिंधुदुर्गनगरी, दि.16 (जि.मा.का.): प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 16 व 17 मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
नागरिकांनी विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी:- विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत, दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा,विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, विजेच्या खांबांपासून लांब रहावे, विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये, एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात, पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये,आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे.अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा, कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी (०२३६३) २५६५१८ सावंतवाडी तालुक्यासाठी (०२३६३) २७२०२८, बेंगुला तालुक्यासाठी (०२३६६) २६२०५३, कुडाळ तालुक्यासाठी (०२३६२)२२२५२५ मालवण तालुक्यासाठी (०२३६५)२५२०४५. कणकवली तालुक्यासाठी (०२३६७)२३२०२५. देवगड तालुक्यासाठी (०२३६४) २६२२०४, वैभववाडी तालुक्यासाठी (०२३६७) २३७२३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ वर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी. हवामान विभागाकडून इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाराणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment