जिल्हा युवा पुरस्कारासाठी ५ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. २3 (जि.मा.का.): राज्याचे युवा धोरण २०१२ मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवा अथवा पात्र नोंदणीकृत संस्थांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात भरुन योग्य कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. ५ एप्रिल २०२३ पर्यंत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.१०,०००/- (प्रति युवक व युवतीसाठी) व गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.५०,०००/- (एका संस्थेसाठी) अशा स्वरुपाचा असेल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यवनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या इ. बाबत केलेली पुरस्कार वर्षापासून गत तीन वर्षातील कामगिरी या पुरस्कारासाठी विचारात घेतली जाईल. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीती व फोटो इत्यादी. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, तसेच या कार्यालयाकडून प्रस्तावासह जोडवयाच्या कागदपत्रांची माहिती, विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी www.dsosindhudurg.blogspot.in किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'