राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी २३ मार्चपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 14 (जि.मा.का) : भारत सरकार युवा कार्य क्रीडा मंत्रालयतर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी दि. २३ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक व युवतीनी www.nyks.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन व नेहरु युवा केंद्र ओरोस येथे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता कमीत कमी १० वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा दिनांक ०१/०४/२०२३ रोजी १८ पेक्षा जास्त व २९ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी करणारा नसावा. निवड झालेल्या युवा स्वयंसेवकाला दर महिना रु.५००० माधन देण्यात येईल. उमेदवार हा त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पद हे पगाराची नोकरी नाही तसेच स्वयंसेवक हा कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सदर करण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२३ आहे. अधिक माहिती करीता जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) दूनध्वनी क्रमांक 02362-295012 वर संपर्क साधावा. जिल्ह्यामध्ये युवकाचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनामध्ये सहभाग घेणे, युवकांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये योगदान देण्याची संधी भारत सरकारद्वारा युवकांच्या नेतृत्व गुणांची क्षमता व त्यांची उर्जा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यामध्ये वापर करणे, त्याचप्रमाणे साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, लिंगभेद, सामाजिक समस्याबाबत जनजागृती अभियान राबविणे. त्या करिता युवकांना संगठीत करणे, युवक महिला मंडळे यांच्याशी संपर्क वाढविणे, त्यांचा दुवा म्हणून कार्य करणे, शासकीय विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविणे तसेच सहकार्य करणे या करिता प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालायामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक म्हणून युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'