जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - सोमनाथ रसाळ

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुख्यालय, जिल्हा नियोजन समिती जुने सभागृह येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.8 मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्हालटकर तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम.एस. निकम, हे मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या जागतिक महिला दिना निमित्ताने, महिला विषयक कायदे व योजना "दक्ष महिला, सक्षम महिला" या उपयुक्त पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. महिला मेळाव्यामध्ये जिल्हास्तरावरील सर्व प्रशासकीय विभागातील सहभागी होणाऱ्या सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला विषयक कायदे, महिलांचे हक्क व संरक्षण या बाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'