शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी उमेदवारांनी अर्ज करावेत - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ इतर मागास प्रवर्गातील नवीन व्यवसाय सुरू करण्याकरीता तसेच व्यवसायामध्ये वाढ करण्याकरीता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त लाभार्थीना योजनांचा लाभ देण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांकरीता वय वर्ष 18 ते 50 करीता या बिनव्याजी रूपये 1.00 लक्ष थेट कर्ज योजना रु.5.00 लक्ष पर्यंतची बीज भांडवल कर्ज योजना, वय 18 से 50 गटातील व्यक्तीना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना रू 10.00 लक्ष पर्यंत तसेच 17 ते 30 वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना राज्यांतर्गत व शिक्षणाकरीता रूपये 10.00 लक्ष व परदेशी शिक्षणाकरीता 20.00 लक्ष पर्यतची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे.
ज्या उमेदवारांना महामंडळाच्या रू 10.00 लक्ष व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये लाभ घ्यावयाचा आहे अशा उमेदवारांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून माहे 10 मार्च पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तळमजला सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनी क्रमांक 02362228119 / 8668898950 -या क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment