सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा - प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिन धारकाच्या जमिन अदलाबदलानंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनींचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांचे आपआपसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील. त्यामुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा होईल.तरी या योजनानेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने यांनी केले आहे. महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक मुद्रांक- २०२२/ प्र.क्र. ९३/म- १ (धोरण) दिनांक ३ जानेवारी २०२३ अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे १२ वर्षेपासून असणाऱ्या शेतजमिनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.१०००/- व नोंदणी फी नाममात्र रु.१०००/- आकारण्याबाबत सवलत देण्यात आलेली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'