वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 19 कर्ज प्रस्तावांना मान्यता - जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का) : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळाची 10 लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या 19 कर्ज प्रस्तावांना आणि रुपये 1 लाख थेट कर्ज योजनेचा एका कर्ज प्रस्तावाला, वसंतराव नाईक महामंडळ यांचे 10लाख वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील एका कर्ज प्रस्तावाला लाभार्थी निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालायात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, सन 2022-23 या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवड समितीचे संपन्न झाली. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मेश्राम, समाजकल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, कौशल्य विकास व रोजगार विभागचे सहायक आयुक्त बिटोडे, आय. टी.आय चे प्रतिनिधी गवस यावेळी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment