फ्रान्स (ल्योन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी माहिती भरावी -प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8qFH8yMrvfTonc77WU67QL7-IGVVsC2m6- 1jK3Qn7Uv6LLw/viewform?usp=sf_link या लिंक ला क्लिक करून आपली माहिती भरावी व या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC- National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्हयात कार्यरत असलेल्या ITIs, Polytechnics, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM/Hospitality Institutes, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी ४६ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ सेक्टरमधून ५० देशातील १०००० उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा १५ देशांत १२ आठवडयासाठी आयोजित करण्यांत आली होती. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'