कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीचा दुसरा व बुस्टर डोस नागरिकांनी तातडीने घ्या - पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्हा लसीकरणात राज्यात चौथ्या क्रमांकावर बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र नागरिकांनी पुढे यावे पालकमंत्र्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी चौथी लाट येणाच्या धोका संभवत नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-१९ नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर लसीचा दुसरा व बुस्टर डोस तातडीने पात्र नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आजार व लसीकरण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ९३ टक्के नागरिकांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे. तर ८३ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. तसेच जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात पहिल्या ४ क्रमांकात असल्याचे यावेळी सांगुन पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात केवळ दोन टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोसचे प्रमाण वाढावे यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहिमेचे आयोजन करावे. त्याचबरोबर कोविड चाचण्याचेही प्रमाण वाढविण्यात यावे. व कोविड बाबत जनजागृती करण्यात यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सध्या सक्रीय रुग्ण २ असल्याचे सांगून आतापर्यंत ५५ हजार ८५१ डिस्चार्ज झाले असून आतापर्यंत १५३३ मृत्यू झाले असल्याचे सांगितले. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.३३ असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यात एकूण ११स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटर असून यामध्ये ४ आरटीपीसीआर तर ७ रॅपीड ॲन्टींजन टेस्ट सेंटर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार ८९५ स्वॅब टेस्टिंग करण्यात आले आहे. यात आरटीपीसीआर ३ लाख ३७ हजार ६६० तर रॅपीड ॲन्टींजन टेस्ट २ लाख ९३ हजार २३५ करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात एकूण 9 हजार ८५७ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८ हजार ३१३ जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार ९९३ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ९ हजार २३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील १ लाख ३९ हजार ४१३ व्यक्तींनी पहिला डोस तर १ लाख १७ हजार २८१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख ६४ हजार ७९४ नागरिकांनी पहिला डोस तर १ लाख ४६ हजार ९४५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील १८ हजार २५५ पहिला डोस तर १० हजार ५६५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील २७ हजार ११६ जणांनी पहिला डोस तर २१ हजार ९३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील २ लाख ६५ हजार ९७७ जणांनी पहिला डोस तर २ लाख २९ हजार ७३४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'