निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठीची तिमाही बैठक 21 रोजी

सिंधुदुर्गनगरी,दि.6(जि.मा.का.)- निवृत्तीवेतधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दर 3 महिन्यांनी जिल्हा स्तरावर बैठक आयोजित केली जाते. ही तिमाही बैठक गुरुवार दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात,बैठकीचा पत्ता, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, तळमजला, दालन क्र.124 सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन क्र.416812 येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती अप्पर कोषागार अधिकारी प्रमोद सिताराम चिंदरकर यांनी दिली. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'