प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या लाभ्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करा - दत्तात्रय भडकवाड

सिंधुदुर्गनगरी,दि.26(जि.मा.का.)- ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत मोहीम आयोजित केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील पात्र शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेतले नाही, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी संबंधित लाभार्थी यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ध्यावा असे आवाहन नोडल अधिकारी पी.एम. किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'