भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त महामानवास अभिवादन

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम आजपासून राबविला जात आहे. येथील समाज कल्याण विभागामार्फत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना सोपविण्यात आली आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे याबाबत नियोजन करण्यात आले आहे. "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांच्यासह सामाजिक न्याय भवन येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'