जिल्हा क्रीडा संकुल सक्षम बनविण्यासाठी विस्तुत आराखडा तातडीने सादर करावा - पालकमंत्री उदय सामंत

सिंथेटीक ट्रॅक साठी सहा कोटीचा निधी उपलब्ध निविदा प्रक्रिया तातडीने राबवा. बॅडमिंटन कोर्टसाठी १ कोटी ५० लाखांचा निधी जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जि.मा.का) : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम व्हावे व जिल्हावासियांना खेळांच्या चांगला सुविधा उपलब्ध व्हाव्यात. जिल्ह्यातून चांगल्या दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल अधिक सक्षम करण्यात येत आहे. खेळांच्या विविध सुविधासाठी जिल्हासाठी शासनाकडून १५ कोटी रुपये मंजुर झाले आहे. या निधीचा बाबतचा आराखडा तातडीने तयार करुन शासनास सादर करावा. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यासाठी ६ कोटी रुपये व बॅडमिंटन कोर्टसाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. या कामाची निविदा तातडीने काढून ही कामे सुरु करावीत असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा अधिकारी अजय शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालय स्तरावर अत्यंत चांगल्या प्रतीची जिम सुरु करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही जिम सुरु करण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करावा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी देवून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात मॅटवरील कबड्डीसाठी एकच संच सध्या उपलब्ध आहे. तरी आणखी तीन मॅट संच खरेदी करण्यासाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव तयार करुन प्रशासनास सादर करावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच जिल्ह्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. तसेच या स्पर्धा आयोजित करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिटन हॉलची दुरुस्ती जुने पत्रे बदलणे यासाठी रु. १ कोटी ५० लाख, जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव दुरुस्ती साठी रु. ३ लाख ५५ हजार व जिल्हा क्रीडा संकुल येथील संरक्षक भिंती दुरुस्ती, कमान व गेट बसविणे इ. कामे करण्यास पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली. ही कामे करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत असेही ते म्हणाले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'