सिंधुदुर्गनगरी येथे 15 रोजी महिला मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त राज्यभर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवार दि. 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'