ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास व पर्यावरण संरक्षणासाठी सक्षम 2022 हा संरक्षण क्षमता महोत्सव

सिंधुदुर्गनगरी,दि.13 (जि.मा.का.)- सक्षम-2022 संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरु केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील तेल उद्योगाने 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता विजय वाघमारे महाराष्ट्र सरकारचे सचिव यांच्या शुभ उपस्थितीत उघ्दाटन समारंभ सपन्न झाला. जीवाश्म इंधनावरील अपव्यय खार्चास आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम उदिष्ट आहे. पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटना(PCRA) प्रटोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने आणि समर्थनासह विविध उपक्रम हाती घेतील. पेट्रोलियम उत्पादनांचे संवर्धन इंधन- कार्यक्रम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे आणि रणनीती प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (PCRA)आघाडीवर आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत आझादी का अमृत महोत्सव थ्रू ग्रानी ॲड क्लीन एनर्जी हरित आणि स्वच्छ ऊर्जा स्वच्छ अपनाए, आझादी का अमृत महोत्सव मनाए या टॅगलाइनसह आणि त्याच खरेपणासह संपूर्ण देशात सक्षम महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याचे माननीय पंतप्रधानांचे घोषित उद्दिष्ट आणि हरित हायड्रोजन मिशन सारख्या प्रयत्नांनी भारताला एका उल्लेखनीय परिवर्तन मार्गावर नेले आहे. या महिनाभरात विविध उपक्रम करावयाचे आहेत त्यात समाविष्ट आहे. उद्योगांसाठी तांत्रिक बैठका, सायक्लोथॉन ,वॉकथॉन, शालेय विर्द्यांसाठी गट चर्चा वादविवाद, महाविद्यालयांमध्ये भित्तिचित्र, वॉल पेंटिंग स्पर्धा,इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिषद, प्रेस रिलीझ, टीव्ही, रेडिओवर टॉक शो आणि जिंगल्स दाखवणे जे ऊर्जेच्या विवेकपूर्ण वापराच्या गरजेबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यास मदत करतील. महाराष्ट्र राज्यात सुमारे 16 प्रकारचे 800 च्या संख्येने उपक्रम आयोजित केले जातील. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'