समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी,दि.14 (जि.मा.का.)- सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग येथील सामाजिक न्याय भवन येथे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गचे प्रमोद जाधव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विजेते चंद्रकांत जाधव उपस्थित होते. या जयंती निमित्त प्रमोद जाधव व चंद्रकांत जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कणकवली येथील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व विचारांवर भाषण केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे धनाकर्ष व प्रशस्तीपत्र त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी-कर्मचारी, सर्व महामंडळे, जिल्हा जात पडताळणी कार्यालय, आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील गृहपाल, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'