महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती व संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन - सहायक आयुक्त समाज कल्याण -दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी,दि.6(जि.मा.का.)- वीरशेव-लिंगायत समाजासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकारी व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकुण दोन महात्मा बसेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थानी 22 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे. सन 2018 -19,2019-20,2020-21 व 2021-22 या चार वर्षाचा एकत्रित घेण्यात येणार असल्याने सर्व व्यक्ती व संस्था यांनी चार वर्षासाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्यात यावेत. तसेच या अर्जाची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी असल्याने, इच्छुक संस्था व व्यक्ती यानी सन 2018-19,2019-20,2020-21 व 2021-22 अशा चार वर्षासाठी दोन वेगवेगळे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे दि 20 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'