ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावे

सिंधुदुर्गनगरी,दि.26(जि.मा.का.)- सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वयेकलम 5 मधील तरतुदी नुसार शासकिय, निमशासकीय, खासगी अस्थापनेतील कर्मचाऱ्यांची माहितीचे तिमाही विवरणपत्र ई-आर-1 पत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांचे आत सादर करणे बंधन कारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भरावे. दिनांक 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर-1 www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावे. ज्या उद्योजक,अस्थापनांना ऑनलाईव्दारे विवरणपत्रे भरण्यास अडचणी येत असतील अशांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362/ 228835 येथे संपर्क साधावा असे आवाहन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त,शा.गि.पवार यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'